Hero Imgs

प्रत्येकाला हिरोची गरज असते.
आणि हिरो कोणीही बनू शकतो.

आम्ही अशा लोकांचा शोध घेत आहोत ज्यांना मदतीची आवश्यकता आहे किंवा जे मदत करू इच्छित आहेत.

आपल्या तपशीलाच्या आधारे आम्ही असे लोक शोधू, जे मदत करू शकतात.

जेव्हा आम्हाला एखादी व्यक्ती सापडेल ज्यांना आपली मदत कामी येईल, तेव्हा आम्ही तुमचा संपर्क करून देऊ.

आम्ही काय काम करतो?

ज्यांना लॉकडाउन मुळे समस्या आहेत त्यांना जे समस्या सोडवू शकतात अशा लोकांशी आम्ही जोडण्याचा प्रयत्न करत आहोत.

आपणास काय मदत हवी आहे किंवा आपण काय मदत करू शकता हे आम्हाला सांगा

तपशीलाच्या आधारे, आम्ही आपली मदत करू शकतील अशा आपल्या आसपासच्या लोकांचा शोध घेऊ.

योग्य गोष्टीसाठी योग्य लोकांशी संपर्क साधा

जेव्हा आम्हाला जे आपल्याला मदत करू शकतात किंवा ज्यांना आपल्या मदतीची गरज आहे अशा लोकांचा शोध लागेल तेव्हा आम्ही त्यांचा संपर्क तुमच्याबरोबर करून देऊ.

आपल्या समस्येचे निराकरण न झाल्यास आपण नवीन हिरो शोधू

आम्ही सामान्य लोक असून मदत करण्याच्या प्रयत्नात आहोत. आपल्या समस्येचे समाधान होईपयत आम्ही प्रयत्न करत राहू


टीम

हि वेबसाईट आणि हे काम चालवण्यासाठी आम्हालाही मदतीची आवश्यकता आहे.

Admin

Members

Cities

Content

Members

Cities

Design

Members

Cities

आम्हाला तातडीने आवश्यकता आहे ह्या लोकांची


डेवलपर्स, सोशल मिडिया व्यवस्थापक, ग्राफिक डिझाइनर, आणि कुठलीही मदत आपण करू शकत असल्यास कृपया संपर्क साधा.

माहिती असूद्या: हे पगारी काम नसून सार्वजनिक सेवा आहे. आमच्यापकी कोणालाही हे करण्यासाठी मोबदला मिळत नाही. आमच्यातील काहीजण हे काम चालू ठेवण्यासाठी पैसे देत आहेत. लॉकडाऊन दरम्यान जर आपण आपला वेळ आणि कौशल्य देऊ असल्यास, कृपया आम्हाला गरजू लोकापयत पोहोचण्यास मदत करा. आपण अक्षरशः जग वाचवत आहोत.

FAQs

सतत विचारले जाणारे प्रश्न

आपण कोण आहात आणि हे का करीत आहात?

कोविड -१९ मुळे आपल्या देशामध्ये निर्माण झालेल्या संकट परिस्थितीत मदत करण्यासाठी आम्ही संसाधने आणि लोक एकत्रित करत आहोत. सरकार आणि पोलीसांचे काम सोपे करण्यासाठी आपण एकमेका सहाय्य करू शकतो.

यासाठी, लोकांना प्रथम कोणाला, कुठे कोणत्या गोष्टींची गरज आहे हे शोधणे, आणि सरकारी नियमांचे उल्लंघन न करता त्यांना कशी मदत करता येईल हे पाहणे आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही ही माहिती संकलित करीत आहोत.

मी तुमच्यावर विश्वास कसा ठेवू?

आम्ही तुमच्यासारखेच सर्वसामान्य लोक आहोत. आमची पार्श्वभूमी पाहण्यासाठी आपण आमची लिंक्डइन प्रोफाइल तपासू शकता. आम्ही घोटाळे करण्यासाठी किंवा कोणाचाही फायदा घेण्यासाठी हे करत नाही आहोत. आम्ही रात्रंदिवस स्वेच्छेने हे काम करीत आहोत. कोणीही आम्हाला पैसे देत नाही आणि आमचा कोणताही छुपा हेतू किंवा राजकीय भूमिका नाही. आम्ही फक्त मदत करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

आपल्याला काही शंका असल्यास कृपया आमच्या अ‍ॅडमिन अजिंक्यला फोन करा.

तुम्ही मला कशी मदत कराल?

आम्ही देशभरातील बर्‍याच नागरिकांशी संपर्क साधत आहोत. आपण मदतीसाठी आमच्याकडे आल्यावर आपल्या जवळ असणारे कोणीतरी मदत शोधण्यासाठी आपल्याशी संपर्क साधेल.

मदत माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल?

लॉकडाऊन मुळे आम्ही मुदतीची हमी देऊ शकत नाही, परंतु आम्ही एका तासाच्या आत आपल्यास प्रतिसाद देण्याचे व आपल्याला शक्य तितक्या लवकर मदत करण्याचे वचन देतो.

मी लोकांना कशी मदत करू?

सध्याच्या संकटात आपली सर्व व्यावसायिक कौशल्ये खूपच मूल्यवान आहेत - नियोजन, समन्वय, व्यवस्थापन, ग्राहक संबंध व्यवस्थापन, समुदाय प्रतिबद्धता, कोडींग, फोटोशॉप - आपल्यास जे काही माहित आहे त्याचा सध्या उपयोग आहे.

या व्यतिरिक्त, आपली लोक कौशल्ये - संभाषण, सहानुभूती, धीर देणे - ह्या गोष्टी देखील लोकांना उपयोगी पडू शकतात.

म्हणून जर आपल्याकडे इंटरनेट व लॅपटॉप किंवा फोन असेल, आणि थोडा वेळ द्यायची तयारी असेल तर देशाच्या चांगल्या भविष्यासाठी आत्ता पाऊल उचला आणि आमच्याशी संपर्क साधा.

मी देऊ केलेल्या मदतीबद्दल माझ्याशी कधी संपर्क साधाल?

लॉकडाऊन मुळे आम्ही मुदतीची हमी देऊ शकत नाही, परंतु आम्ही एका तासाच्या आत आपल्यास प्रतिसाद देण्याचे आणि आपल्या मदतीची आवश्यकता असलेल्या लोकांशी आपल्याला जोडून देण्याचे आम्ही वचन देतो.

आम्हाला आपल्या सेवांसाठी पैसे द्यावे लागतील?

नक्कीच नाही. हा आम्हा सुजाण नागरिकांचा पूर्णपणे ऐच्छिक उपक्रम आहे. आमच्या सेवेसाठी आम्ही तुम्हाला कधीही पैसे मागणार नाही. परंतु, आपल्याला आपले किराणा सामान व औषधे इत्यादींसाठी नेहेमी प्रमाणेच पैसे द्यावे लागतील.

या पोर्टलद्वारे आपल्याशी कोणी संपर्क साधला असेल आणि त्याने आपल्याला त्यांना पैसे देण्यास सांगितले तर कृपया नकार द्या आणि आम्हाला घटनेची खबर द्या.

लक्षात ठेवाः कधीही, पेटीएम किंवा गुगल पे प्रकारच्या अ‍ॅप्सवरून कधीही कोणत्याही अज्ञात व्यक्तीला पैसे पाठवू नका. आपल्या कोणत्याही नुकसानासाठी केवळ आपणच जबाबदार असाल.

आपण कुठे काम करत आहात?

आम्ही सध्या मुंबई, दिल्ली आणि बेंगलुरुमध्ये आहेत, पण आम्ही तुम्हाला देशातील कोठल्याही माणसांशी जोडू शकतो.

मदत करायची असल्यास मला बाहेर जावे लागेल का?

नाही, आम्ही तुम्हाला बाहेर जाण्यास सांगणार नाही. ज्यांना आपल्या मदतीची आवश्यकता असेल अशा लोकांशी आम्ही आपल्याला जोडून देऊ. घरी बसूनच जितके शक्य आहे तेवढे काम आपल्याला करायचे आहे.

माझा तपशील कोणाकडे असेल?

आमच्याकडे आपला तपशील सुरक्षित आहे. आम्ही केवळ आपल्याला मदत करण्यासाठी किंवा आपल्याशी संपर्क साधण्यासाठी तपशील मागतो. आम्ही त्यांचा इतर कोणत्याही प्रकारे वापर करणार नाही.

तुम्ही मला एटीएम किंवा बँकेतून पैसे काढून देऊ शकता का?

नाही. आम्ही पैसे हाताळत नाही. आम्ही केवळ आवश्यक वस्तू पुरवण्यास मदत करू शकतो. तथापि, आपणास वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती किंवा तत्सम निकटची बाब असल्यास, आम्ही आपल्या जवळच्या बँक किंवा एटीएममध्ये वाहतुकीची व्यवस्था करण्यात मदत करू शकतो.

मी भारताबाहेर आहे, पण माझ्या नातेवाईकांना भारतात मदतीची आवश्यकता आहे.

आम्ही भारतात कुठेही लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करू. फक्त संपर्कात रहा आणि त्यांचे तपशील आणि गरजा आम्हाला सांगा.